नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या १५६ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या विभागीय कार्यालय, अभ्यासिका, ५०० मुलांचे व ५०० मुलींच्या वसतिगृह इमारतींचे तसेच 43 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या धनगर समाजातील १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थीनी साठी वसतिगृह व कार्यालय इमारत आणि २५ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून भुमिपूजन झाले.
भुमिपूजन समारंभ कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, माजी मंत्री महादेव जानकर,माजी खासदार हेमंत गोडसे, सकल मराठा समाज व सकल धनगर समाजातील मान्यवर आदि उपस्थित होते.
यावेळी सकल मराठा समाज बांधव आणि सकल धनगर समाज बांधव यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार करण्यात आला. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केलेल्या विविध विकास कामांवर आधारीत विकास पर्व या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.