इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची कन्या सारा आणि भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल हे दोन्ही सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्याचे कारण आहे या दोघांमध्ये बिनसल्याचे. यो दोघांची सोशल मिडियामध्ये मोठी चर्चा होत आहे. निमित्त आहे ते या दोघांनी एकमेकांना सोशल मिडियावर अनफॉलो केल्याचे.
२०१९ मध्ये आयपीएल सामन्यानंतर शुभमन गिल चर्चेत आला आणि सोबत सारा तेंडुलकर आणि त्यांचे नाते यावरही चर्चा रंगायला लागल्या. यानंतर शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघांची नावं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. याआधी सुद्धा दोघांच्या अफेअरची चर्चा होती. मात्र, आता या दोघात बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो देखील केले आहे. भारताचा सलामीवीर शुभमन गिलने अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्ध आपल्या करिअरमधील पहिले शतक झळकावले. भारताने झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-० अशा फरकाने जिंकली होती. तेव्हा भारतीय संघ जिंकेल अशी आधीच अपेक्षा असली तरी या मालिकेत शुभमन गिलने जे केले ते कुणालाच अपेक्षित नव्हते. गिलने तीन सामन्यांच्या मालिकेत २४५ धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन उत्कृष्ट खेळी केल्या. त्यापैकी एक शतक होते.
गिलच्या कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. १३० धावांच्या शानदार खेळीसह गिलने सचिन तेंडुलकरचा २४ वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. यानंतर गिलला त्याच्या सोशल मीडियावर सारा तेंडुलकरने शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर त्यांच्या नात्यावर चर्चांना सुरुवात झाली. मात्र सारा आणि शुभमनने कधीच या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली नाही. सोशल मीडियावर नेहमीच शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरची चर्चा असते. मात्र, सोशल मीडियावर परस्परांना अनफॉलो केल्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.
Sara Tendulkar and Shubhaman Gill Breakup Relation
Cricketer Celebrity Instagram Unfollow