अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयातील सुरगाणा तालुक्यात अनेक नावाजलेली आदिवासी कला पथक असून दरवर्षी श्रावणात महिनाभर सापुतारा या प्रसिध्द पर्यटन स्थळावर सापुतारा फेस्टिवलचे आयोजन गुजराथ सरकारच्या पर्यटन विभागातर्फे आयोजित केले जाते. सुरगाणा शहरा पासून अवघ्या २० ते २५ कि.मी अंतरावर असल्याने या फेस्टिवलसाठी सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड, डोल्हारा, चिंचपाडा येथील कलाकार आदिवाशी संस्कृतीशी निगडीत, लोककला,पौराणिक संस्कृती या फेस्टिवल महोत्सवा दरम्यान सादर करीत असतात. महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान आदिवाशी नृत्य, भोवाडा,पौराणिक कला पथक निघाल्यावर परदेशी पर्यटकांना त्याची भुरळ पडली आणि त्यांनी त्यात सहभागी घेत नृत्यावर ठेका धरला. महिनाभर हा महोत्सव सुरु राहत असल्याने महाराष्ट्र सीमेवरील कला पथकांना येथे मोठी मागणी असते. नाशिक जिल्हयातील सुरगाणा तालूक्यात अनेक ठिकाणी चांगली पर्यंटन स्थळे असून त्याचा विकास गुजराथ सरकार प्रमाणे केला तर या भागातील अनेकां रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा या कला पथकातील प्रमुखांनी केली आहे.