नाशिक – सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी ५० हजार भाविकांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेतले. तर प्रसादालयात सुमारे १५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आज श्री सप्तशृंग देवीची महापूजा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. सौ. भारतीताई पवार व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त सौ. मनज्योत पाटील यांनी सपत्नीक महापूजा केली.
सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी देवीचे रूप अधिकच खुलून दिसत होतं प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री (अन्न प्रक्रिया व जलशक्ती) मा. नामदार प्रल्हादसिंग पटेल, आ. श्री राहुल आहेर, आ. सौ. दिपाली चव्हाण, मा. आ. संजय चव्हाण, मा. आ. वैभव पिचड, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, तहसिलदार बंडू कापसे, विश्वस्त ऍड श्री ललित निकम, विश्वस्त भूषणराज तळेकर, अन्न व औषधे प्रशासनाचे सह आयुक्त उदय लोहकरे, कौतीक महाराज पगार, रोपवे व्यवस्थापक राजू लुम्बा, भाजप नेते विकास देशमुख, भाजप नेते नंदू खैरनार यांनी श्री भगवतीचे दर्शन घेतले. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदी उपस्थित होती.
महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे १५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव दरम्यान कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, भक्तनिवास सहा विभाग प्रमुख शाम पवार, प्रसादालाय पर्यवेक्षक प्रशांत निकम, सह पर्यवेक्षक रामचंद्र पवार, उपकार्यालाय प्रमुख गोविंद निकम, मंदिर विभाग सहा प्रमुख नारद आहिरे, सह पर्यवेक्षक सुनील कासार, सह पर्यवेक्षक विश्वनाथ बर्डे, धर्मार्थ रुग्णालय प्रमुख डॉ. धनश्री धोडकी, विद्युत विभाग प्रमुख जगतराव मुंदलकर, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख व वाहन विभाग प्रमुख संतोष चव्हाण तसेच सर्व ट्रस्ट कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, रोप वे कर्मचारी यांसह जिल्हा पोलीस व महसूल प्रशासन विभाग आदी विशेष परिश्रम घेत आहेत.