सप्तशृंगगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हयात परतीच्या पावसाने काल संध्याकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली. नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावरील नांदुरी घाटात मध्यरात्री जोरदार पावसाने मोठी दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळतात ट्रस्ट प्रशासनाने रात्रीतून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेले दगड बाजूला करत सगळा मलबा तेथून हटवला. पहाटे पर्यंत रस्ता मोकळा करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.