शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सप्तशृंगी गडावर कीर्तिध्वज ध्वज फडकला; ४० हजार भाविकांनी घेतले देवीचे दर्शन

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 4, 2022 | 6:52 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221004 WA0034 1

 

सप्तशृंगगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या महानवमी निमित्त श्री सप्तशृंगी देवीची महापूजा ग्रामपंचायत सदस्य संदीप शशिकांत बेनके व देणगीदार भाविक अरविंद गणपत कल्पे यांनी सपत्नीक केली. सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. प्रसंगी डी.एफ.ओ. उमेश वावरे, आमदार सुहास कांदे, आमदार दिलीप मोहिते, नाशिक जिल्हा परिषदच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लीन बनसोड, विश्वस्त संस्थेचे विश्वस्त बंडू कापसे, विश्वस्त अॅड. ललित निकम, विश्वस्त डॉ श्री. प्रशांत देवरे, विश्वस्त श्री. भूषणराज तळेकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. यांसह यंत्रणा होम गार्ड सोबत पोलिस कार्यरत आहे.

सालाबाद प्रमाणे अश्र्विन नवमीस सप्तशृंगगडावर देवीच्या शिखरावर मध्यराञी ध्वज लावला जातो. दरेगाव येथील गवळी परिवार या ध्वज लावण्याचे मानकरी असुन गेल्या कित्येक वर्षापासुन हा अदभुत सोहळा पार पाडण्याचे काम हे परिवार करीत असून, या शिखरावर जाण्यासाठी कुठुनही रस्ता नाही. सरळ शिखरावर जाणे म्हणेज मुत्युला आंमञण देणे असे आहे पण कसलीही दुखापत न होता हे कार्य गेल्या कित्येक वर्षा पासुन गवळी परिवार पार पाडत आहे. हा सोहळा बघणे म्हणेज डोळयाचे पारणे फेडणारा सोहळा असतो या ध्वजाची विधीवत पुजा देवी संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, ध्वजाचे मानकरी गवळी परिवार सदस्य, विश्वस्त तथा कळवण तहसीलदार बंडू कापसे, विश्वस्त् अॅड. श्री. ललित निकम, विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे, विश्वस्त श्री. भूषणराज तळेकर, उपविभागीय अधिकारी गणेश मिसळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, सप्तशृंगगड ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार, गावाचे माजी पोलीस पाटील शशिकांत बेनके यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासकीय प्रतिनिधी, कर्मचारी, पुजारी, रोप वे कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

या ध्वजासाठी मध्यराञी १२ वा शिखरावर जाऊन तेथील पुजा विधी करण्यासाठी १० फुट लांब काठी ११ मीटर केशरी कापडाचा ध्वज पुजेसाठी गहु, तादुळ, कुंकु, हळद जाणाऱ्या मार्गातील विविध ठिक ठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य नैवेद्य आदिसह साहित्य घेऊन जावे लागते. काल दुपारी ०० वाजून ०० मिनटानि श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात किर्ती ध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते करून किर्तीध्वजाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर हा ध्वज फडकिविण्यासाठी दरेगावचे गवळी पाटील मार्गस्थ झाले. समुद्र सपाटीपासून ४५६९ फुट उंचीवर सप्तशृंगगड आहे. वर्षभरातून दोन वेळा हा किर्तिध्वज सप्तशृंगी देवीच्या शिखरावर फडकीवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री व नवरात्रौत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकीवले जाते. दरेगावचे गवळी पाटील, सप्तशिखरांचा सुळका चढून निशाण लावतात. जाताना मार्गातील देवतांची पूजा करण्यासाठी ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य इत्यांदी वस्तू ध्वज फडकीवणार्या कडे दिल्या जातात. दुपारी साधारण ४.३० च्या सुमारास गावातून किर्तीध्वजाची वाजत गाजत मिरवणूक निघाली. त्यानंतर सायंकाळी ६:३० वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहचून पाटील देवीसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर पुढील मार्गासाठी रवाना झाले. या सोहळ्यात उतरेकडील सुळक्यावरून पाटील शिखरावर पोचतात, रात्र असतानाही त्यांनी टेंभा किवा प्रकाशासाठी लागणारे कोणतेही उपकरण सोबत न घेता ते जातात. पाटील ज्या शिखरावर जातात तो रस्ता बऱ्याच भाविकांनी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला किवा कुन्हा समोर नाही आला. शिखरावर पोचल्यानंतर जुना ध्वज काढून त्यांनी तेथे नवा ध्वज लावला. शिखरावर चढण्यासाठी त्यांना ६ ते ७ तासाचा कालवधी लागतो दरेगावचे गवळी पाटील पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान शिखरावरून त्यांचे मंदिरात आगमन होताच भाविक दर्शन घेऊन आज परतीच्या मार्गाला लागतील. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या परंपरेला वैशिष्ट्य मानले जाते ५०० ते ६०० वर्षापेक्षा आधिक हि परंपरा राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीच्या पवननगरीत अखंडपणे चालू आहे. दरम्यान देवी मंदिर सभामंडपात सायंकाळी पाचला शतचंडी याग व होमहवन विधी कार्यक्रमास पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रारंभ झाला. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी खान्देस, मराठवाडा, विदर्भ नव्हेच तर गुजरात, राजस्थान व इतर राज्यातून भाविकांनी हजेरी लावली.

महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव दरम्यान पुरोहित वर्ग, सर्व ट्रस्ट कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, यांसह जिल्हा पोलीस व महसूल प्रशासन विभाग आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयुष्यमान भारत गोल्डन कार्डची अशी करा नोंदणी; १२०९ आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत

Next Post

आयुष्यमान भारत योजनेच्या ई-कार्डसाठी विशेष मोहीम; १२०९ आजारांवर करता येणार मोफत उपचार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Next Post
Aayushyaman Bharat scaled e1664889970916

आयुष्यमान भारत योजनेच्या ई-कार्डसाठी विशेष मोहीम; १२०९ आजारांवर करता येणार मोफत उपचार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011