साप्ताहिक राशिभविष्य – ९ ते १६ मे २०२१
……
मेष – मागील अनुभव व भविष्यकालीन लॉजिक यावर निर्णय घ्यावे. बर्याच प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. ज्ञानाचा पुरेपूर वापर करावा.
वृषभ – अपत्य वर्गाला यश मिळेल. अनावश्यक खरेदी टाळा. अनपेक्षित मोठे खर्च समोर येतील. पोटाच्या तक्रारी सांभाळा. योगासन व प्राणायाम यावर भर द्या.
मिथुन – गैरसमजातून कोणते मत ठरवू नये. कामातील एकाग्रता वाढवावी. विनाकारण वाद टाळावे. मानसिक स्वास्थ्य सांभाळावे.
कर्क – सहकार्य करताना मागील अनुभव लक्षात ठेवा. टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारा. परिचीतामध्ये वाद होणार नाही याची काळजी घ्या.
सिंह – अनपेक्षित जबाबदारी वाढेल. सहनशक्ती शक्ती वाढवा. हितचिंतकांमुळे मानसिक आधार मिळेल. हेका सोडावा.
कन्या – स्वतःला शांत ठेवा. आर्थिक मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करा. अनपेक्षित खर्च टाळा. शुभ वार्ता मिळेल. गरजू व्यक्तींना अवश्य मदत करा.
तूळ – घर सजावटीच्या नवीन कल्पना. नवीन मेनू बनेल. नवीन खरेदी होतील. फायदा तोटाचा अंदाज घेऊन खर्च करा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला लाभेल.
वृश्चिक – कौटुंबिक जबाबदारी वाढेल. चिडचिड टाळा. अनपेक्षित सुखद घटना. आर्थिक भार वाढेल.
धनु – निष्कारण वादात पडू नये. शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने पावले पडतील. स्पर्धात्मक सप्ताह. योग्य अयोग्य निर्णय घेताना दीर्घकालीन विचार व्हावा.
मकर – चित भी मेरी पट भी मेरी असे नको. फार अपेक्षा ठेवू नयेत. जुन्या चिंता मिटतील. गुंतवणुकीस अपेक्षित रिटर्न मिळेल.
कुंभ – फायद्याचे अथवा तोट्याचे यामध्ये गल्लत करू नये. वेळेची योग्य ती गुंतवणूक करावी. भावना आणि व्यवहार यातील हेडलाईन ओळखावी.
मीन – बऱ्याच निर्णयांमध्ये करावे की नाही अशी स्थिती होईल. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे. मदत कार्यात वाढ करावी. धार्मिक कार्य पार पडेल.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.