साप्ताहिक राशिभविष्य – ४ ते ११ जुलै
मेष – अडचणीवर संयमाने मात करा. मित्रमंडळीकडून योग्य ते सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. सर्व प्रकारची गुंतवणूक सांभाळून करा……
वृषभ – वेळेचा पुरेपूर वापर करा. आर्थिक नियोजन आवश्यक. उसनवारी सांभाळा. व्यावसायिक यशासाठी अधिक परिश्रम गरजेचे…..
मिथुन – गुप्त शत्रूंवर लक्ष ठेवा. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. स्वयंशिस्त आवश्यक. व्यक्तिगत देवाण-घेवाण सांभाळा. जुने व्यवहार यशस्वी होतील……
कर्क – अधिक कार्यक्षम व्हावे लागेल. गोड बोलून कार्यभाग साधा. अनपेक्षित शुभवार्ता मिळेल. सार्वजनिक कामात यशप्राप्ती राहील…..
सिंह – कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. सल्ला जरा जपूनच द्या. गुंतवणूक सुरक्षित असेल तरच करा. प्रवास संभवतो. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल……
कन्या – आर्थिक इच्छापूर्ती होईल. सोपवलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे. ध्येयाबाबत चलबिचल नको…….
तूळ – गरजेपेक्षा अधिक मेहनत टाळा. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. आहार-विहार याकडे लक्ष द्या. टीका खिलाडू वृत्तीने स्वीकारा…..
वृश्चिक – रागावर नियंत्रण ठेवा. तोल मोल के बोल आवश्यक. मेहनतीला योग्य यश मिळेल. परिचितांशी संबंध चांगले ठेवा……
धनु – उत्तम श्रोते बना. टीका टाळा. महत्त्वाच्या कामाचे श्रेय मिळेल. कौटुंबिक सुसंवाद ठेवा. अनपेक्षित बाबींवर अनपेक्षित मोठा खर्च संभवतो……
मकर – मानसिक स्वास्थ्य सांभाळा. वात-प्रकोप काळजी घ्या. अति व्यापारी दृष्टिकोन नको. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल, अशी अपेक्षा नको……
कुंभ – आर्थिक, मानसिक, शारीरिक, स्वास्थ्य त्रिकोण सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा. अर्जंट व इम्पॉर्टन्ट कामात फरक करा……
मीन – फक्त कानावर आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. धारदार बोलण्यापेक्षा सौम्य शब्दात काम साधा. आर्थिक दारोमदार विश्वासू व्यक्तींवर ठेवा…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.