साप्ताहिक राशिभविष्य – ३० मे ते ६ जून
…..
मेष – कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील याची काळजी घ्यावी. मोठी आर्थिक देवाण-घेवाण टाळावी. जुनी नुकसान भरपाई मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील……
वृषभ – व्यवसायिक आत्मविश्वास वाढवणारा सप्ताह. नोकरीत बढतीची संधी. मोठे खर्च नियंत्रित करावे. वास्तुविषयक घडामोडी होतील……
मिथुन – जनसंपर्काचा फायदा होईल. अनुभवी व्यक्तींशी सल्लामसलत करावी. दिवाणी प्रकरणात लक्ष घालावे. पाठदुखी कडे दुर्लक्ष नको…..
कर्क – मोठे व्यावसायिक निर्णय होतील. कौटुंबिक जबाबदार्या यशस्वीपणे पार पडतील. जवळच्या नातेवाईकांशी वाद टाळा. जुने गैरसमज दूर होतील…..
सिंह – सहकुटुंब प्रवास योग. धार्मिक कामे पार पडतील. अनपेक्षित शुभवार्ता मिळेल. आठवणीत राहील असा संस्मरणीय प्रसंग घडेल……
कन्या- आपला दृष्टिकोन हा इतरांना ऐकलाच पाहिजे, असा अट्टाहास नको. सरकारी कामात विशेष लक्ष घालावे. कोर्ट प्रकरणात यश. मानसन्मान मिळेल…….
तूळ – भावनिकपेक्षा व्यावहारीकतेला महत्त्व द्यावे. समस्यांचा लॉजिकली विचार करावा. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने गुंतवणूक करू नये. पोटाच्या समस्या सांभाळा……
वृश्चिक – अपत्यांकडून शुभवार्ता मिळेल. दात दुखीच्या समस्या सांभाळा. पाहुण्यांची वर्दळ राहील. पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा……
धनु – शॉर्टकट उत्पन्नाचा मार्ग अवलंबू नये. वादग्रस्त व्यवहार टाळावे. डोळ्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष नको. व्यवसायात मोठी उलाढाल काळजीपूर्वक करावी…….
मकर- प्रॉपर्टीचे जुने व्यवहार मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना नवीन संधी प्राप्त होईल. शुभकार्य ठरेल…….
कुंभ – कार्याचा मान-सन्मान मिळेल. मोठ्या सन्माननीय व्यक्तींशी परिचय होईल. व्यवसायासाठी भांडवल पुरवठा उपलब्ध होईल. कौटुंबिक कुरबुरी सांभाळा……
मीन – परदेशस्थ व्यवहार होतील. अति मेहनत टाळावी. मनासारखा मेनू खायला मिळेल. मनस्वास्थ्य सांभाळा….

व्हॉटसअॅप – 9373913484