मेष – या सप्ताहात अधिकाधिक ज्ञान संग्रह करावा. त्यातल्या त्यात व्यावसायिक ज्ञान मिळवण्याकडे अधिक कल ठेवावा. परिपूर्णतेचा पाठपुरावा करा. तब्येतीकडे दुर्लक्ष नको……….
वृषभ – आर्थिक संचयाचा फायदा होईल. वाहन सौख्य मिळेल. मित्र परिवाराला आपल्या सल्ल्याचा फायदा होईल. जुने महत्त्वाची कामे मार्गी लागतील……..
मिथुन – वादविवाद टाळा. आपल्या दैनंदिन बाहेरील कामावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करा. अर्धवट धार्मिक कार्य महिनाअखेरीस पूर्ण करून घ्या. गरजेपेक्षा अधिक चिंता नको……
कर्क – मोठ्या गुंतागुंतीच्या प्लॅनिंग मध्ये पुढाकार होईल. एकाचवेळी अनेक कामे निघाल्याने अर्जंट व इम्पॉर्टंट कामे ठरवा. काही गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याचा संभव. सामूहिक सहानुभूती मिळेल……
सिंह – मोठ्या धार्मिक कार्याचे प्लॅनिंग होईल. आरोग्य सांभाळा. पित्ताचा त्रास बळावेल. आप्तस्वकीयांकडून मनासारखे वागणे होईल. अनपेक्षित गुड न्यूज मिळेल…….
कन्या – कल्पना शक्तीपेक्षा कृतिशीलता वाढवा. क्या करे क्या ना करे यातून पटकन बाहेर या. स्वतःला परिस्थिती अनुकूल करून घ्या……
तूळ – आप्तस्वकीयांचे कडू, गोड बोल खिलाडूवृत्तीने स्वीकारावे. कौटुंबिक वाद वाढू देऊ नये. स्वभावावर नियंत्रण ठेवावे. आपले काम भले व आपण भले ही नीती ठेवावी…….
वृश्चिक – महत्वाच्या प्रसंगी परिचित व्यक्तीची मदत होईल. आर्थिक गणित ताळ्यावर येईल. अंदाजाप्रमाणे व्यवसायिक उलाढाल होईल. आळसावर नियंत्रण ठेवा. पाहुण्यांची सरबराई होईल……
धनु – वाहन मेंटेनन्सच्या कामाची डोकेदुखी वाढेल. महत्वाची कागदपत्रे सांभाळा. मौल्यवान वस्तू सांभाळा. व्यवसायात ना नफा ना तोटा स्थिती होणार नाही याची काळजी घ्या……
मकर – दिवाणी व्यवहारातून ताणतणाव. पूर्वापार मालमत्तेसाठी साधक-बाधक चर्चा होईल. स्पष्ट बोलण्यापेक्षा योग्य त्या बोलण्याने फायदा होईल……
कुंभ – संपर्कातील प्रत्येकावर योग्य तो विश्वास दाखवावा. पाठीमागे टीका-टिप्पणी टाळा. गुंतवणुकीचा परतावा उशिरा मिळू शकतो. अर्धशिशीचा त्रास सांभाळा………
मीन – उपयोगाचा व बिन उपयोगाचा व्यक्ती ओळखण्याचे कसब वाढवा. भावनिक गोष्टींवर अधिक वेळ खर्च करू नये. उत्पन्न व खर्चाचे गणित सांभाळावे. मोठे व्यवहार विचारपूर्वक करावे…….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!