साप्ताहिक राशिभविष्य – २५ एप्रिल ते २ मे
मेष- ध्येयावर ठाम राहा. मोठा आर्थिक व्यवहार टाळा. व्यवसाय, नोकरीच्या नवीन संधी. ओळखींचा फायदा होईल.
वृषभ- वास्तुविषयक व्यवहार यशस्वी होतील. चैनीच्या वस्तूंवरचा खर्च कमी करावा. शैक्षणिक प्रगती. अनपेक्षित शुभवार्ता मिळतील.
मिथुन- नोकरीत वरिष्ठांची कृपा राहील. परदेशगमनाची संधी. शब्दात अडकू नये. कोर्टकचेरीच्या कामात यश.
कर्क – व्यावसायिक स्पर्धा टाळा. भावनिक आरोग्य जपा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. छोट्या गुंतवणुकीत फायदा.
सिंह – बढतीचे योग. दीर्घकाळ अडकलेले प्रश्न सुटतील. राजकीय संबंध उपयोगात येतील. मित्रपरिवार मदतीस येईल.
कन्या – अनामिक चिंता यावर जास्त विचार करू नये. गैरसमज, संशय टाळा. किरकोळ दुखापतीपासून सावध राहा. वाहन जपून चालवा.
तूळ- खर्च, उत्पन्न त्याचा मेळ बसवा. अनपेक्षित शुभ समाचार. बौद्धिक क्षेत्रातील मंडळींशी चर्चा ठेवा. गुंतवणुकीसाठी शॉर्टकट मार्ग टाळा.
वृश्चिक- स्वभावावर संयम ठेवा. घरगुती वाद टाळा. व्यवसायात संमिश्र यश. नवख्या व्यक्तींशी व्यवहार नको.
धनु – कर्तृत्वाचा ठसा उमटेल. परदेशगमन योग. नोकरीत कार्य गौरव होईल. कमरेचे दुखणे सांभाळा.
मकर- महत्वाची कागदपत्रे सांभाळा. व्यवसायातील नव्या शुभपर्वास सुरुवात. खरेदी विक्री व्यवहार सांभाळून करा. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.
कुंभ- वादग्रस्त प्रकरणे हुशारीने हाताळावी. डोळ्यांच्या तक्रारी वेळीच निवारण करा. धार्मिक कार्य पूर्ण होतील. स्पर्धात्मक यश प्राप्त होईल.
मीन – कलावंतांना यश देणारा सप्ताह. विवाहयोग जुळून येतील. प्रिय व्यक्तींशी संवाद होईल. जुन्या गुंतवणूकीतून लाभ होईल.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे