साप्ताहिक राशिभविष्य – २३ ते ३० मे २०२१
…….
मेष – अनामिक चिंता बाळगू नये. सप्ताह शेवटी शुभवार्ता. नवीन व्यावसायिक जडणघडण होईल. कलाकारांना दिलासा मिळेल.
वृषभ – कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. वाहन सांभाळून चालवा. आर्थिक ओढाताण वर मात कराल. नवीन परिचय संभाळून करा.
मिथुन – मनाविरुद्ध घटना खिलाडूवृत्तीने स्वीकारा. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जीसाठी अधिक परिश्रम करावे लागेल. प्राप्त परिस्थिती शांतपणे स्वीकारा.
कर्क – हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा. अनपेक्षित शुभवार्ता मिळेल. नवीन व्यावसायिक संधी निर्माण होतील. कौटुंबिक सदस्यांची शैक्षणिक प्रगती होईल.
सिंह – सर्वंकष फलदाई सप्ताह. भागीदारी व्यवहार सांभाळा. व्यावसायिक अंदाज यशस्वी होतील. ज्येष्ठांची प्रकृती सांभाळा.
कन्या – जुनाट व्याधी सांभाळा. प्रवास संभवतो. नोकरीत बढती. वास्तुविषयक व्यवहार सांभाळून करा. पगार वाढ शक्यता.
तूळ – भावनिक ओढाताण सांभाळा. व्यावसायिक स्पर्धा खिलाडूवृत्तीने घ्या. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना हे लक्षात असू द्या.
वृश्चिक – मोठे आर्थिक निर्णय संभाळून घ्या. नोकरदारांच्या बदलीची शक्यता. शुभकार्य ठरेल. नूतन वस्तू खरेदी होईल.
धनु – मित्र परिवाराची योग्य तिथे साथ लाभेल. सार्वजनिक जीवनात चांगले अनुभव येतील. विद्यार्थ्यांसाठी शुभवार्ता मिळेल. परिस्थितीजन्य अनुभवाचा त्रागा नको.
मकर – अनामिक हुरहुर सांभाळा. कायदेशीर बाबींचे प्रश्न मिटतील. आपल्या मेहनतीचे चीज होईल. मध्यस्ती यशस्वी होईल.
कुंभ – विदेशी व्यापार संधी. मिळकतीच्या व्यवहारात लाभ. नातेसंबंधातील कटुता मिटेल. साथ-संगत सांभाळा.
मीन – नवनवीन व्यावसायिक संधी मिळतील. अतिविश्वास टाळा. आर्थिक टार्गेट पूर्ण होईल. कार्यास प्रसिद्धी मिळेल.
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा.