साप्ताहिक राशिभविष्य – २ ते ९ मे
मेष – स्पर्धकांशी कॉलिटी कॉम्पिटिशन करावी. अनपेक्षित फायदा होईल. मोठी आर्थिक तरतूद विचारपूर्वक करावी. कायदेशीर व्यवहार संभाळा.
वृषभ – मोठ्या गुंतवणुकीची संधी दीर्घकालीन फायद्याची ठरेल. शब्द जपून वापरा. मानसन्मानाचे योग आहेत. ज्येष्ठांचे अनुभव कामी येतील.
मिथुन – अचानक मोठा फायदा. सुयोग होईल. आपली मध्यस्ती फलद्रूप होईल. नवीन ओळखीचा महत्त्वाचा फायदा होईल. व्यवसायात नवीन बदल करण्यास अनुकूल काळ.
कर्क – जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. स्थावर खरेदी योग. दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. स्ट्रेस मॅनेजमेंट आवश्यक.
सिंह – जुने हेवेदावे मिटवा. कटुता टाळा. वाहन जपून चालवा. लांबचा प्रवास टाळा. नवीन जनसंपर्क फायद्याचे. तब्येतीच्या किरकोळ कुरबुरी राहतील.
कन्या – व्यवसायात गुंतवणूक वाढवण्याची संधी. मेहनतीला पुरेपूर यश येईल. अतिरिक्त खर्चामुळे तारेवरची कसरत होईल. व्यवसायिक मनोवृत्ती वाढवा.
तूळ – निर्णयातील डी पेंडन्सी टाळा. तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. लाइफ टाइम सकारात्मक टिप्स वापरा. कार्यक्षमता वाढवा. संधीचे सोने करण्याचा काळ.
वृश्चिक – व्यवसाय-नोकरी बदलाचे योग. त्यातून मोठा फायदा होईल. पद व प्रतिष्ठा मिळेल. नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या.
धनु – कॅलक्युलेटेड रिस्क घ्या. मोठी आर्थिक गुंतवणूक नको. उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधा. शब्दावर विश्वास न ठेवता अनुभवावर विश्वास ठेवा.
मकर – मोठे खर्च टाळा. किरकोळ दुखणे सांभाळा. मौल्यवान कागदपत्रे व वस्तू सांभाळा परिचितांकडून आर्थिक मदत होईल.
कुंभ – नवीन व्यवसाय कुशलता शिकण्यात फायदा. बिझी शेड्युलमध्ये तब्येत सांभाळावी. आकस्मिक व्यवसायिक सुवर्ण संधी मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला आवश्यक.
मीन – विद्यार्थी वर्गाने शैक्षणिक कार्यात मन एकाग्र करावे. अनुभवी व्यक्तींचा सल्ला मिळेल. व्रत-वैकल्ये पार पडतील. अर्जंट व इम्पॉर्टंट कामात फरक करावा.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे…