साप्ताहिक राशिभविष्य – १८ ते २५ एप्रिल
मेष – वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. किरकोळ वाद वाढू देऊ नये. मोठी गुंतवणूक टाळावी. तडजोडीने कामे मार्गी लावावीत.
वृषभ – सामंजस्याने समस्या सोडवाव्यात. कामाचं योग्य ते प्लॅनिंग करावे. जुने आप्तस्वकीय भेटतील. प्रकृतीची काळजी घ्या.
मिथुन – नकारात्मकता टाळा. कामात विलंब होणार नाही याची काळजी घ्या. बढतीचे योग. डोकेदुखी सांभाळा.
कर्क – ताण तणावापासून पासून दूर राहा. व्यवसायिक नवीन आव्हाने स्वीकारा. वास्तु नूतनीकरण प्लॅनिंग होईल. खानपान विशेष काळजी घ्या.
सिंह – बदलीचे योग संभवतात. कोर्टकचेरीची कामे काळजीपूर्वक करा. ज्येष्ठांचा सल्ला फायदाच राहील. ध्यानधारणा, प्राणायाम याचा आधार घ्या.
कन्या – अहंकार टाळा. विश्वासू व्यक्तींची साथ लावेल. अनपेक्षित व्यावसायिक संधी मिळेल. पुरेशी विश्रांती घ्या.
तूळ – नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. स्वतःची शारीरिक विशेष काळजी घ्या. कौटुंबिक मतभेद टाळा. वात प्रकृतीची काळजी घ्या.
वृश्चिक- सकारात्मक विचार ठेवून मानसिक प्रकृती सांभाळा. व्यापारात प्रगती होईल. बाहेरचे खाणे-पिणे टाळा. वादाचे प्रसंग टाळावेत.
धनु – नव्या व्यवसायिक संधी प्राप्त होतील. तब्येतीबाबत निष्काळजीपणा नको. दिवाणी दावे लाभात राहतील. अति व्यायाम टाळा.
मकर – मौखिक आरोग्य सांभाळा. आर्थिक फायदा बाबत वेट अँड वॉच. उत्पन्नाचे अन्य स्त्रोत तयार करा. सामाजिक मान सन्मान मिळेल.
कुंभ – जुनी येणे येतील. मागील आर्थिक गुंतवणुकीचा लाभ होईल. व्यापारात मागील अनुभवावरून मोठे निर्णय घ्या.
मीन- मोठी खरेदी टाळा. व्यवसायिक मोठा निर्णय सध्या टाळा. आकस्मिक खर्चाची शक्यता. गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने व्यवसाय करा.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.