साप्ताहिक राशिभविष्य १६ ते २३ मे २०२१
मेष – व्यवसायिक यश दृष्टिक्षेपात येईल. सहकार्यांमध्ये समन्वय साधावा. व्यवसायिक जबाबदारीचे योग्य ते भान असावे. सुरक्षित गुंतवणूक करा.
वृषभ – कौटुंबिक वादामध्ये वेळ व शक्ती खर्च करू नये. दूरचा प्रवास टाळावा. सकारात्मक दृष्टीकोनाने कामे मार्गी लावावीत. मोठ्या निर्णयांसाठी वेट अँड वॉच.
मिथुन – स्वतःला वेळ द्या. फक्त सकारात्मक अनुभव आठवणीत ठेवा. सामाजिक संबंधात सजग असावे. मोठा निर्णय तडकाफडकी घेऊ नये.
कर्क – आपले प्रत्येक म्हणणे ऐकलंच पाहिजे, असा दुराग्रह नको. कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी अनपेक्षित शुभवार्ता. फायदा होण्यासाठी पेशन्स ठेवा.
सिंह – सरकारी कामे वेळेत पार पाडा. आत्मविश्वास वाढेल असाच उपक्रमात भाग घ्या. परिचितांमधले अर्थकारण सांभाळा.
कन्या- व्यवसायाच्या नवीन संकल्पनांचा विचार करा. भावना व कर्तव्य याची सीमारेषा ठरवून घ्या. आपला सल्ला अनेकांना उपयोगी होईल.
तूळ- कौटुंबिक सौख्य राखा. मोठा आर्थिक उपक्रम समन्वयाने मार्गी लावा. गैरसमज करून घेणे टाळा. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.
वृश्चिक – किरकोळ गोष्टी वादाचे कारण होणार नाही, असे बघा. महत्वाची कागदपत्रे योग्य पद्धतीने ठेवा. आपण सुचवलेल्या संकल्पना अनेकांना उपयोगी ठरतील.
धनु – मित्रपरिवारात आनंदाची बातमी मिळेल. तडजोडीची भूमिका स्वीकारावी. वादा ऐवजी चर्चेतून मार्ग काढावा. बोलताना दक्षता घ्या.
मकर – अतिआत्मविश्वास टाळा. त्याचप्रमाणे अति विश्वास टाकण्याचे टाळा. आपले हितचिंतक ओळखून मन मोकळे करा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
कुंभ – सहनशीलपणाचा फायदा होईल. यशस्वी नियोजनामुळे मोठी कामे मार्गी लागतील. सर्वांच्या भूमिकेचा आदर करावा. मनासारखा मेनू खायला मिळेल.
मीन – नवीन क्षेत्रात करिअरची संधी मिळेल. प्रतिक्रिया योग्य शब्दात द्यावी. माहिती नसताना गैरसमज करून घेऊ नये. अनपेक्षित प्रगतीची संधी मिळेल.

व्हॉटसअॅप – 9373913484