मेष – कॅलकुलेटेड रिस्क घ्या. अति मेहनतीने तब्येतीवर परिणाम होईल. खानपान सांभाळा. अनिद्रा टाळा. वेळेचे योग्य नियोजन करा. मल्टिटास्किंग प्लॅनिंग करावे…..
वृषभ – अतिरिक्त खर्च व खरेदी टाळा. प्रयत्नपूर्वक कार्यास चौफेर यश मिळेल. कोणत्याही वादात आपण कारणीभूत होऊ नका. अडकलेली कामे बुद्धिचातुर्याने मार्गी लावा. ध्येयावर लक्ष ठेवा……
मिथुन – जुने वाद, गैरसमज टाळून नव्याने रिलेशन मेंटेन करा. अधिक व्यापक पद्धतीने प्लॅनिंग करून प्रगतीचे जाळे वाढवा. किरकोळ घटनांमुळे महत्त्वाच्या व्यक्तींची कटुता टाळा. नकारात्मक विचार नको………
कर्क – आर्थिक व्यवहार अधिक काळजीपूर्वक करा. उधार, उसनवार देणे, घेणे टाळा. वैचारिक मतभेद प्रयत्नपूर्वक टाळा. वरिष्ठांकडून प्रशंसा. परिचितांकडून अपेक्षित सहकार्य. कफाचा त्रास संभवतो……
सिंह – नवा व्यवसायिक विचार सुचेल. कठीण प्रसंगी भाग्याची साथ मिळेल. कौटुंबिक स्पेस बुद्धीचातुर्याने टिकवा. परिचितांशी भावनिक आघाडी सांभाळा. चिंता करण्यापेक्षा योग्य प्लॅनिंग करा…….
कन्या – रचनात्मक विचार वाढवा. भावनात्मक संयम दीर्घकालीन फायद्याचा. सकारात्मक परिचितांशी संबंध वाढवा. लॉंग आर्थिक प्लॅनिंग साठी टर्म लॉजिक नसल्यास नुकसान……..
तूळ – यशप्राप्तीसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रयत्न गरजेचे. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करू नये. ज्येष्ठ तसेच वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. टीम वर्क वर भर द्या. जुने सहकारी साथ देतील……
वृश्चिक – घाईगडबडीत मोठे निर्णय नको. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष नको. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. भागीदारी व्यवसाय सांभाळून करा……..
धनु – कौटुंबिक कुरबुरी वाढवू नये. प्रत्येकाला स्पेस द्यावा. प्लॅनिंगचा अतिरेक नको. प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा. मोठ्या खरेदीची शक्यता. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नपूर्वक आखणी हवी……
मकर – छोट्या वादाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. व्यापक व्हावे. नवे करारमदार होतील. अतिउत्साह त्रासदायक परिश्रमाचे चीज होईल. अपत्यांकडून सुखद वार्ता. कौटुंबिक ताळमेळ जमेल…….
कुंभ – सामाजिक कामात व्यक्तिगत खर्चावर नियंत्रण ठेवा. बुद्धी व भावना यातील समतोलाचा फायदा होईल. व्यापार वृद्धी व आर्थिक उलाढाल वाढेल. जोडीदाराच्या भावना जपा. म्हणजे तोही आपल्या जपेल…….
मीन – संमिश्र अनुभवांचा सप्ताह. अनपेक्षित सुखद वार्ता. शब्द व क्रोधावर संयम हवा. विचारपूर्वक आश्वासन द्यावं. आर्थिक दृष्ट्या संमिश्र अनुभव. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!