नवी दिल्ली – कृषी समस्यांसंदर्भात आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहीले आहे. देशातील तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी केल्यानंतर राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची अपेक्षा केंद्र सरकारला होती. मात्र, आता मोर्चाने खुल्या पत्राद्वारे त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधानांना लिहीलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे की, तिन्ही कृषी कायदे आपण मागे घेतले. त्याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही आपले आभारी आहोत. मात्र, अद्यापही शेतीशी संबधित प्रश्न सुटलेले नाही. संसदेत आपण हे तिन्ही कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण कराल, अशी आम्हाला खात्री आहे. शेतमालालाकिमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी एमएसपी हमी देणारा कायदा लागू करावा, ही मोर्चाची प्रमुख मागणी आहे. यासंदर्भात आपण होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनातच निर्णय घ्यावा, तसेच, लखीमपूर हत्याकांडाचे मूख्य सूत्रधार असलेले केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मोर्चाने केली आहे. मोर्चाने दिलेले पत्र आणि त्यांच्या प्रमुख ६ मागण्या खालीलप्रमाणे