मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड येथील माजी नगरसेवक व शिवेसना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद यांचे रात्री अपघाती निधन झाले. नाशिक येथे लग्नसोहळयानंतर ते लासलगाव मार्गे मनमाड येथे जात असतांना निंबाळे ते रायपूर दरम्यान वाहेगाव साळे येथे हा अपघात झाला. ते ५४ वर्षाचे होते.
शिवसेनेत ते लहानपणापासून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी विविध पदे भूषविली. माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे निकटवर्तीय असलेले संतोष बळीद दोन वेळेस नगरसेवक झाले. शहरातील विविध आंदोलनात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पाणीप्रश्न, वीजेच्या प्रश्नासह त्यांनी केलेली विविध आंदोलने चर्चेत राहिली. शिवसेनेत फुट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात राहणेच पसंद केले.
सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता हरपला असे सांगत विविध क्षेत्रातील नागरिकांनी बळीद यांना श्रध्दांजली अर्पण केली.