बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संतूरवादक पद्मविभूषण शिवकुमार शर्मा यांचे निधन

मे 10, 2022 | 3:23 pm
in संमिश्र वार्ता
0
SHIVKUMAR SHARMA

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. शर्मा (84) हे गेल्या 6 महिन्यांपासून किडनीशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते आणि ते डायलिसिसवर होते. मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. शिवकुमार शर्मा हे संतूर हे लोकप्रिय वाद्य म्हणून ओळखले जातात. संतूर हे जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय वाद्य होते, जे शिवकुमार शर्मा यांनी जगभरात लोकप्रिय केले होते. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीताच्या विश्वातील एका युगाचा अंत झाला आहे.

शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनामुळे हे वाद्यही सतार आणि सरोदच्या श्रेणीत गणले जाऊ लागले. संगीतप्रेमींमध्ये शिव-हरी म्हणून ओळखले जाणारे बासरीवादक पंडित हरी प्रसाद चौरसिया यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली. त्यांनी मिळून सिलसिला, लम्हे, चांदनी यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांना संगीत दिले. पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या १३व्या वर्षी संतूर वाजवायला सुरुवात केली. 1955 मध्ये त्यांनी मुंबईत पहिला परफॉर्मन्स दिला. त्यांना 1991 मध्ये पद्मश्री आणि 2001 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.

https://twitter.com/narendramodi/status/1523927993848107010?s=20&t=XPdBW6hwK9TBJENREYg3kg

संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, पंडित शर्मा आणि संतूर वाद्य यांचे अतूट असे नाते आहे. त्यांच्या नावानेच संतूरला ओळख मिळाली. तर भारतीय संगीताला संतूर मिळाले. पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतीयांना नाही, तर जगाला भुरळ घातली. जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, तर याच भूमीतील संतूर या एका लोकवाद्याच्या स्वर्गीय अशा तरंगांची पंडितजींनी जगाला ओळख करून दिली. जगभरात जिथे भारतीय संगीत पोहोचले आहे, तिथे संतूर पोहोचले. हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे हे योगदान आहे. विनम्र स्वभावाच्या पंडित शर्मा यांनी संगीत क्षेत्राची अखंड सेवा केली. पंडित शर्मा यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापिही विसरता येणार नाही. शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदूपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मां यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रीलंकेत हिंसाचाराचा आगडोंब! पंतप्रधानांसह मंत्र्यांची घरे पेटवली; खासदारही ठार (व्हिडिओ)

Next Post

महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचा इशारा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचा इशारा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011