नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७२५ वर्ष संजीवन समाधी सोहळा २२ निमित्ताने हुंडिवाला लेन, नाशिक येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित हरिनाम सप्ताहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य चतुर्थी शनिवार १२ नोव्हेंबर २०२२ ते कार्तिक वद्य १४, बुधवार २३ नोव्हेंबर २०२२ आयोजित केला आहे. या सदरच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी पारायण, किर्तन, प्रवचन व भजन श्रवण आदी कार्यक्रम पार पडणार असून सकाळी ७ ते ८ काकडा, ८ ते ९.३० देवता पुजन, ९ ते १२ सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण अमृतानुभव पारायण, एकादशस्कंद एकनाथी भागवत पारायण, संहिता पारायण असे नित्याचे कार्यक्रम होणार आहेत.
तसेच दुपारी ३.३० से ५.०० यावेळेत खालीलप्रमाणे महिलांच्या भजनी मंडळांचे कार्यक्रम होणार आहे.
शनिवार, १२-१९-२२ श्री ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ
रविवार, १३-११-२२ श्री दासबोध भजनी मंडळ
सोमवार, १४-११-२२ श्री स्वामीनारायण भजनी मंडळ
मंगळवार, १५-११-२२ श्री समर्थ अभ्यास मंडळ
बुधवार, ९६-१९-२२ श्री स्वरांजली भजनी मंडळ
गुरुवार, १७-११-२२ श्री केयुर भजनी मंडळ
शुक्रवार, १८-११-२२ श्री भक्तीसुधा भजनी मंडळ
शनिवार, १९-११-२२ श्री दुर्गादेवी भजनी मंडळ
रविवार, २०-११-२२ श्री गजानन भजनी मंडळ
सोमवार, २१-११-२२ श्री कल्याणी भजनी मंडळ
तर सायं. ७ ते ९ यावेळेत खालीलप्रमाणे पुरुषांचे किर्तन पार पडणार आहे.
रविवार १३-११-२२ – ह.भ.प. श्री. कैलास महाराज बेलजाळी, नाशिक
सोमवार १४-११-१२ – ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज जगताप (पुणे)
मंगळवार १५-११-२२- ह.भ.प. श्री. निलेश महाराज पवार
बुधवार १६-११-२२ – ह.भ.प. श्री. रामकृष्णदास महाराज लहवीतकर
गुरुवार १७-११-२२ – ह.भ.प. डॉ.श्री. पुष्कर महाराज गोसावी, पैठण
शुक्रवार १८-११-२२- ह.भ.प. श्री. भागवत महाराज कबीर , पंढरपूर
शनिवार १९-११-२२- ह.भ.प. श्री. माधवदास महाराज राठी, नशिक
रविवार २०-११-२२- ह.भ.प. श्री. श्रीहरी महाराज चक्रांकीत, आळंदी
सोमवार २१-११-२२ ह.भ.प. श्री. कल्पेश महाराज भागवत (देवपुर)
मंगळवार २२-११-२२ ह.भ.प. श्री. जयंत महाराज गोसावी
बुधवार २३-११-२२ ह.भ.प. श्री. जयंत महाराज गोसावी ( काल्याचे कीर्तन)
रविवार २०-११-२२ विशेष उपस्थिती व आशीर्वाद ह.भ.प. चक्रांकित महाराज, आळंदी, पुणे
त्याचबरोबर विशेष कार्यक्रमात रविवार १३ नोव्हेंबर २०२२ सकाळी ६.१५ ते ९ यावेळेत श्री संत गोंदवलेकर महाराज मंदिर भक्त परिवार, गंगापूर रोड, नाशिक यांच्यामार्फत काकड आरती होणार आहे. तरी जास्तीत जास्त नाशिककरांनी या उत्सवाला उपस्थित राहून नेश्वरी पारायण, किर्तन, प्रवचन व भजन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर हुंडिवाला लेन, नाशिक येथील गुरुजी पांडुरंग शौचे गुरुजी यांनी केले आहे.