नाशिक – ते श्रीमंतही आहेत आणि विख्यातही आहेत. ते अशा पध्दतीने जीवन जगतात की समाजासही हेवा वाटेल. त्यांची पार्श्वभूमी तशी खूपशी चांगलीही नाही, त्यांच्या पाठीशी राजकीय शक्ती नाही परंतु प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपले जीवन शून्यातून विश्वनिर्मितीकडे नेणार्या उद्योजकांचा ‘सन्मित्र आयकॉन पुरस्कार’ सोहळा २६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३:३० वाजता, गीता लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची माहीती लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष भूषण महाजन व आयकॉन समिती प्रमुख निलेश मकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.महाजन म्हणाले की, समाजातील अशा कर्तव्य संपन्न यशवंतांच्या गौरव करणे आम्ही आपलं कर्तव्य समजतो. अशा या असंख्य यशवंतांपैकी सुरुवातीला काही यशवंतांच्या यशोगाथा समाजापुढे व विशेषतः समाजातील तरुणाई पुढे मांडून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा. त्यांना याद्वारे यशोशिखर गाठण्यास मार्गदर्शन मिळावे हा या सन्मित्र आयकॉन यशोगाथा पुस्तके मागील उद्देश व संकल्पना आहे. एवढेच कर्तृत्ववान आहेत असे नाही, तर ही केवळ काही पावलांची सुरुवात आहे भविष्यात पुन्हा अशा यशस्वी व्यावसायिक शिलेदारांचा यशवंतांचा शोध घेऊन त्यांना समाजापुढे सन्मित्र आयकॉन यशोगाथा पुस्तिकेद्वारे आणून समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल यासाठी लाडशाखिय वाणी समाज सन्मित्र मंडळ यापुढेही प्रयत्नशील राहील असेही त्यांनी सांगितले.
सत्कार समिती प्रमुख निलेश मकर यांनी सांगितले की, गौरवार्थी उद्योजकांची आयुष्यातील सस्मंरणीय क्षणांची माहीती ‘यशोगाथा’ पुस्तिकेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. या सत्कार सोहळ्यासाठी मालपाणी ग्रुपचे चेअरमन गिरीश मालपाणी, तसेच पुणे येथील प्रसिध्द उद्योजक मनोज शिरोडकर,संस्थेचे विश्वस्त मधुकर ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर धामणे, संजय येवले आदी उपस्थित राहणार आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम हा निमंत्रितांसाठी आँफलाईन ठेवण्यात आला असून. सभासदांसह, समाज बांधवांना आँनलाईन या कार्यक्रमाचा आनंद घेता येण्यासाठी सन्मित्र मंडळातर्फे फेसबुक व युट्युब लाईव्ह कार्यक्रमाचा लाभ सर्वांना घेता येणार असल्याची माहीती सचिन बागड, प्रशांत शिरोडे, गिरीश महाजन तसेच सोहळा समितीने दिली आहे.
सन्मित्र मंडळाचे सामाजिक उपक्रम
अवघे ३ हजार रूपये घेऊन सभासद होणार्या सभासदांसाठी सन्मित्र मंडळाच्या माध्यमातून सुरु असलेल्या आधार योजना, अपघाती विमा योजना, आपत्कालीन वैद्यकीय निधी योजना,रूग्णोपयोगी साहित्य सेवा, वैद्यकीय सेवेअंतर्गत मेडीकार्ड योजना, सन्मित्र पालकत्व योजना, उच्च शिक्षणासाठी आर्थिक कर्जाऊ शिष्यवृत्ती, विद्यार्थी दत्तक योजना, अद्यावत अभ्यासिका व वाचनालय, आपत्कालीन निधी योजना यासारख्या योजना सातत्यपूर्ण राबवित आहेत.येणार्या काळात धर्मार्थ दवाखाना व आनंदाश्रम योजना राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. मंडळाचे कार्य दिवसेंदिवस वाढत असून आजमितीस मंडळाचे ६५०० सभासद आहेत.