नाशिक – कोण दिवस येईल कैसा हे कोणालाही सांगता येत नाही. यासाठीच सन्मित्र मंडळाची आधार योजना संकटात उभी राहील असा आशावाद लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष भूषण महाजन यांनी व्यक्त केला. लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळाची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माहेरघर मंगल कार्यालयात सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाली त्यावेळी श्री.महाजन बोलत होते.
यावेळी सन २०२१ ते २०२३ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी घोषणा विश्वस्त मधुकर ब्राह्मणकर यांनी घोषीत केली. यामध्ये अध्यक्षपदी गिरीष महाजन, उपाध्यक्ष निलेश मकर, सचिव सचिन बागड, खजिनदार अतुल देशमुख, चिटणीस प्रशांत शिरूडे यांची तर कार्यकारिणीमध्ये देवीदास कोठावदे, वर्षा महाजन, प्रतिभा वाणी, जितेंद्र येवले, नंदलाल धांडे, सुनिल धामणे, किशोर सोनजे, विशाल कोठावदे यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार संचालकपदी वसंतराव येवलेकर, रविंद्र राहुडे, विनोद दशपुते, राजेश मालपुरे, शरद वाणी, शरद धामणे, गणेश येवला, कमलेश कोठावदे, सुनील ब्राह्मणकर, मनोज शिनकर, भूषण वाणी, दिपश्री मेणे, भूषण सोनजे, किशोर शिरूडे, रूपेश वरखेडे, राहुल ब्राह्मणकर, सुभाष कोठावदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्ष गिरीष महाजन म्हणाले की, शहरापेक्षा ग्रामीण भागात या आधार योजनेची नितांत गरज आहे. ग्रामीण भागातील उत्पन्नाचे स्त्रोत शहरापेक्षा कमी आहेत. त्यामुळे ‘सन्मित्र आपल्या दारी’ ही योजना राबवून तळागाळातील समाजबांधवांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात व्यासपीठावर विश्वस्त मधुकर ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर धामणे, संजय येवले, भूषण महाजन, रविंद्र राहुडे, शरद धामणे उपस्थित होते. या कार्यक्रमात वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या १०५ निवृत्त सभासदांचा शाब्दीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिभा वाणी यांनी केले तर अतुल देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाणी समाज मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन बागड, माजी अध्यक्ष राजेश कोठावदे, सुभाष मुसळे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.