इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. या व्हिडीओत एका पैशाने भरलेली बॅग दिसत आहे. दरम्यान शिरसाट यांनी बँक पैशांनी भरलेली नाही. तिच्यात कपडे आहेत असा दावा केला आहे.
खा. राऊत यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते! स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस! असे म्हणत टीका केली आहे. तर दुसरी एक पोस्ट त्यांनी हिेदीत केली असून त्यात म्हटले आहे की, इस रोमांचक vedio को आदरणीय प्रधान मंत्री नरेंद्र मोदी और गृहमंत्री अमित शहा भाई ने देखना चाहिये! देश मे ये क्या चल रहा है!
(महाराष्ट्र के एक मंत्री का ये vedio बहोत कुछ कहेलाता है)
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, व्हिडिओत जे दिसतंय ती माझी बेडरुम आहे. मी बनियनवर बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बँग ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होती की मी कुठूनही प्रवास करुन आलो आहे. मी कपडे काढले आहेत. मी बेडवर बसलो आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एवढे सारे पैसे मी बँगमध्ये कसे ठेवेन, घरातील आलमा-या मेल्या आहेत का.
https://twitter.com/rautsanjay61/status/1943602319989596317
https://twitter.com/rautsanjay61/status/1943595234535063586