मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कालचा दिल्ली दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. अचानक झालेल्या या दौ-यामागे काय कारण आहे याचा शोध सर्वजण घेत आहे. दरम्यान या दौ-यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत टीका केली.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले, दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली! तूर्त इतकेच! बाकीचा तपशील लवकरच! असे म्हटले आहे.
या टीकेवरुन शिंदे हे गुरुपौर्णिमेनिमित्त गेल्याचा राऊत यांनी सांगितले. तर दुसरीकडे या दौ-यामागे वेगवेगळे कारण सांगितले जात आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे व उध्दव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने काय फरक पडेल यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.