इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत मोठा विजय मिळवला. पाकिस्तानच्या संघाने विजयासाठी १२८ धावांचे आव्हान दिले होते. ते टीम इंडियाने ३ विकेटस गमावत १५.५ ओव्हरमध्येच पूर्ण करुन १३१ धावा केल्या. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सुर्यकुमार यादव यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करुन इच्छितो. ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. या सामन्यात भारतीय संघाने पाकीस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोन न करता त्यांना धडा शिकवला. पण, या सामन्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले की, पाकिस्तान जिंकला – पराभून झाला, याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. अशा सामन्यावर आम्ही थुंकतो. पैशांसाठी खेळले, एका सामन्यावर बरिष्कार टाकू शकले नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. भारत विरुध्द पाकिस्तानच्या सामन्यावर दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळण्यात आला. या दीड लाख कोटी रुपयांमधील अधिकृतपणे १००० कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले. तसचे दीड लाख कोटी रुपयांमधून साधारण २५ हजार कोटी रुपये पाकिस्तान गेले. आता हाच पैसा आपल्याविरुध्द वापरला जाणार असेही त्यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने परवाणगी दिल्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानविरुध्द खेळली असं सुनील गावसकरांनी सांगितले. जर सरकारने पाकिस्तानविरुध्द खेळण्यास परवाणगी दिली नसती तर टीम इंडिया खेळली नसती असेही गावस्कर म्हणाल्याचं संजय राऊत यांनी सांगितले. टीम इंडियाने हस्तांदोलन केले नाही. याचं भाजपवाले कौतुक सांगताय. देशाची जनता मुर्ख का, तुम्ही पाकिस्तानविरुध्द मैदानात खेळलात ना…देशासाठी लोकांनी रक्त सांडलं, फासावर गेले, अनेक लोक शहीद झाले आणि तुम्ही हस्तांदोलन केले नाही. त्याचं कौतुक करताय. हे हस्तांदोल केलं नाही, हे काही पहलगाम हल्ल्यावरील उत्तर झालं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.