मुंबई – कोरोना संसर्गावरुन महाराष्ट्राला लक्ष्य करणाऱ्या भाजपवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रावा बदनाम करण्याचे आणि बिगर भाजपशासित सरकारांना लक्ष्य करण्याचा हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले की, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब या तिन्ही राज्यात बिगर भाजप सरकार आहे. आणि याच तिन्ही सरकारांना लक्ष्य केले जात आहे. ही तिन्ही राज्ये कोरोना लढाईत अपयशी ठरल्याचे केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटले आहे. मात्र, तसे पाहिले तर हे सर्वप्रथम केंद्र सरकारचे अपयश आहे. कारण, कोरोना विरुद्धची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढली जात आहे. केंद्राच्या सर्व सूचनांचे पालन राज्य सरकार करीत आहेत. जिथे भाजपचे सरकार नाही तेथील राज्य सरकार अपयशी ठरले असे सचिवांचे म्हणणे असेल तर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधून कोरोना पळून गेला का, असा सवाल विचार भाजपलाही राऊत यांनी टोला लगावला आहे.