मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी मंगलकार्य आहे. त्यांची कन्या पूर्वशीचा विवाह निश्चित झाला आहे. त्यामुळेच राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सकाळी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पवार यांना कन्येच्या विवाहाचे निमंत्रण दिले. त्यानंतर राऊत यांनी सायंकाळच्या सुमारास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी राऊत यांनी कोश्यारी यांना विवाह समारंभाला येण्याची विनंती केली तसेच निमंत्रण पत्रिका दिली.
हे आहेत जावई
संजय राऊत यांची कन्या पूर्वशी ही उच्चशिक्षित आहे. तिचे कार्यालय मुंबईतच सायन परिसरात आहे. राऊत यांनी साकारलेल्या ठाकरे या चित्रपटाची पूर्वशी ही निर्माती आहे. तर, राऊत यांच्या जावयाचे नाव आहे मल्हार. ते आयटी इंजिनीअर आहेत. मल्हार यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. मल्हार यांचे वडिल हे जिल्हाधिकारी आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे राऊत यांचे व्याही आहेत. नार्वेकर हे अत्यंत हुशार आणि अभ्यासू अधिकारी आहेत.
राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/jsAjdCfCU2
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 9, 2021