मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अखेर शिवसेना खासदार संजय राऊत यांना रात्री उशीरा अटक केली. आज त्यांना न्यायालयात ११.३० वाजता हजर केले जाणार आहे. ईडीच्या पथकाने रविवारी सकाळी ७ वाजताच राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ईडीचे पथक संजय राऊत यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले. तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली आहे..
राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना समन्स पाठवले होते पण ते हजर झाले नाहीत. हे प्रकरण १०३४ कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हवाला देत संजय राऊत यांनी ईडी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास नकार दिला होता. हिंमत असेल तर एजन्सीने अटक करावी, असेही ते म्हणाले होते.
याच डीएचएफएल-येस बँक प्रकरणात ईडीने पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातही ईडीला संजय राऊत यांची चौकशी करायची आहे. DHFL प्रकरणही पत्रा चाळ प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. एप्रिलमध्ये ईडीने संजय राऊत यांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. सकाळी संजय राऊत यांनीही ट्विट करून खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही, मी मेला तरी शरण येणार नाही, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र आणि शिवसेनेचा लढा सुरू असल्याचे म्हटले होते.