इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मंत्री जयकुमार गोरे हे विकृत मंत्री असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घरातील एक महिलेचा छळ आणि विनयभंग केला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ही महिला येत्या काही दिवसात विधान भवनसमोर उपोषणला बसणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
खा. राऊत पुढे म्हणाले की, संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आता हे पात्र पुन्हा निर्माण झाले आहे. फडणवीसांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे. आणि सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. तसेच मंत्री असतील तर महिला अत्याचाराविरुध्द, महिलांच्या सबलीकरणावर देवेंद्र फडणवीस केस बोलणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
तर काँग्रसेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. १० दिवस जेलची हवा खाऊन येतो. तसेच १० हजार रुपयांचा न्यायालयाचा दंड भरतो. आणि पुन्हा महिलेला ब्लॅकमेल करायला लागतो असा आरोप केला.