इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलिस कर्मचा-यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वरंक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर ट्विट करुन एक व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थितीत केले आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, याने पोलिसांवर हल्ला केला? अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे।