मुंबई – राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे काही आमदार नॅाट रिचेबल असल्याचेही कबूल केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरु असून पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आमचे शिवसैनिक आमच्याकडे परत येतील असा विश्वासही खा. राऊत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी राज्यात कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे आमचे जिवा भावाचे सहकारी आहेत. ते निष्ठावंत शिवसैनिक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी गैरसमजातून काही आमदार गुजरातला नेण्यात आले असल्याचेही कबूल केले. एकनाथ शिंदे सुध्दा मुंबईच्या बाहेर असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपचा घाव हा छातीवर नसून पाठीवर असल्याचे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी शिवेसेनेवर घाव घालणे म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना दुबळी करण्याचं कारस्थान सुरु असल्याचे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेतून जे बाहेर पडले त्यांची अवस्था काय आहे हे आपण बघितल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या काही आमदारांची व्यवस्था भाजपच्या गुजरात अध्यक्षांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.