नाशिक – नाशिक महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे १०० नगरसेवक निवडून येतील असा विश्वास उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेना नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनच्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर त्यावरही राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, १९४७ साली जसे आंदोलन झाले व ब्रिटिश सरकार पळाले. तशीच जनता आता रस्त्यावर आली असती. त्यावेळेस कोण पंतप्रधान, कोण गृहमंत्री आहे हे जनतेने पाहिले नसते. त्यामुळेच कायदे मागे घेतलले गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायदे रद्द झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियावरही त्यांनी चिमटा काढला. मोदी यांनी घेतलेला निर्णय दु:खद असल्याचे पाटील यांना वाटत असेल तर त्यांना शोक संदेश पाठवू, शोक सभा आयोजित करू असेही ते म्हणाले.