पुणे– अजितदादा आमचं एेका नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीत गेलेच आहे असे सूचक विधान खा.संजय राऊत यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा सत्ता बदलाच्या राजकीय चर्चेला उधान आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मिश्कीलपणे हे विधान केले असले तरी त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या मेळाव्यात खा. राऊत यांनी मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहे असे सांगितले. त्यानंतर पत्रकारांकडे बघतांना ते म्हणाले पण थोडे थांबा चुकीचे लिहू नका. ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत, आता दिल्लीत आपल्याला राज्य करायचे असे सांगून आपल्या विधानाचे लगेच स्पष्टीकरणही दिले. पण, तरी या विधानामुळे राजकीय चर्चेला उधान आले. या मेळाव्यात त्यांनी पालकमंत्र्याच्या दराराला घाबरु नका, काही झाले तर मी आहे असेही त्यांनी सांगितले. अजितदादांशी बसून बोलू एकत्र काम करायचे आहे असेही त्यांनी सांगितले. अजितदादा आमचे एेका, नाहीतर गडबड होईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी राऊत म्हणाले की राज्यात महाविकासआघाडी आहे, मग महापौर पदाची आपण इच्छा व्यक्त केली, तर त्यात काय चुकले. आता संवाद साधू, आले तर सोबत नाहीतर एकटे लढू. आपण सगळ्या उमेदवारांची तयारी करू असेही ते म्हणाले.
परवाणगी नसतांना मेळावा
कोरोनाचे काही निर्बंध कायम असल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली होती. तरी शिवेसेने सेनेने हा मेळावा घेतला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा हा मार्गदर्शन मेळावा पार पडला. यावेळी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला.