इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन कर्मचा-यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. त्यानंतर यावर विरोधकांनी थेट त्यांच्या कृतीवर हल्लाबोल करत टीका केली. तर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित केला. यावेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मारहाण करणे योग्य नसल्याचे सांगितले. पण, त्यानंतर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. पण, आता मरिन ड्राईव्ह पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदार गायकवाड यांच्याबरोबर आणखी एका व्यक्तीच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली. सोशल मीडियातील व्हिडिओ आणि पोलिस कर्मचा-याच्या तक्रारीच्या आधारावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान या गुन्ह्याची माहिीत पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना कळवली जाणार आहे. सेक्शन ३५२, ११५ (२) अंतर्गत एनसी दाखल करण्यात आली आहे.
काल विधानसभेत चर्चा
आमदार परब यांनी कर्मचा-यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्यांना मारा असे सांगत जोरदार टीका काल विधानपरिषदेत करत अशा आमदाराचे निलंबण करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, असं वर्तन योग्य नाही. भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही. अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा असे मुख्यमत्री म्हणाले.