इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन कर्मचा-यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. त्यानंतर यावर विरोधकांनी थेट त्यांच्या कृतीवर हल्लाबोल करत टीका केली. काल झालेल्या दिवसभरातील या घटनेनंतर एफडीएने कॅन्टीनची तपासणी केली. त्यानंतर कॅन्टीनच्या अंजता केटरर्सचा परवाना निलंबित केला. अन्न औषध प्रशासनानेच पथक या मारहाणीनंतर दाखल झाले त्यांनी कॅन्टीनमधील स्टोअर रुमची तपासणी केली. खाद्यपदार्थ आणि तेलाच्या बाटल्यांचे सॅम्पल नमूने घेतले. ही सगळे नमूने सील करुन तपासणीसाठी पुढे फॅारेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे स्टोअरचे ऑडिटही झाले.
काल विधानपरिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यात आमदाराचे निलंबण करण्याची मागणी केली होती. पण, कॅन्टिनचाच परवाना रद्द झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदरांचे असं वर्तन योग्य नाही. भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही. अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा असे सांगितले होते.
तर काँग्रसने हे तेच आमदार महाशय आहेत ज्यांनी संरक्षणासाठी असलेल्या पोलिसाला स्वतःची गाडी धुवायला लावली होती. फडणवीस आपण गृहमंत्री म्हणून यावर काय कारवाई करणार आहात? की नेहमीप्रमाणे असल्या गुन्हेगारांना अभय देणार आहात? असा प्रश्न केला.