इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजी नगरमध्ये कन्नड विधानसभा मतदार संघात पती विरुध्द पत्नीच्या लढाईत पत्नीने बाजी मारली. केंद्रीय माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी त्याचे पुर्वाश्रमीचे पती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुध्द ही लढत चांगलीच चर्चेत होती. त्यात शिवसेना शिंदे गटाच्या संजना जाधव यांना ८४ हजार ४९२ तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना ६६ हजार २९१ मते पडली. तर ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत यांना ४६ हजार ५१० मते पडले
संजना जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचे पती हर्षवर्धन जाधव हे २००९ व २०१४ मध्ये सलग निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली. पण, त्यांचा त्यात पराभव झाला.
संजना जाधव या लोकप्रिय असून त्यांनी या ठिकाणी आपली उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर या निवडणुकीत कोणाचा विजय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात पत्नीचा विजय झाला.