इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजी नगरमध्ये कन्नड विधानसभा मतदार संघात पती विरुध्द पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी त्याचे पुर्वाश्रमीचे पती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुध्द निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
संजना जाधव यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचे पती हर्षवर्धन जाधव हे २००९ व २०१४ मध्ये सलग निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली. पण, त्यांचा त्यात पराभव झाला.
संजना जाधव या लोकप्रिय असून त्यांनी या ठिकाणी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आता या निवडणुकीत कोणाचा विजय होतो हे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने या मतदार संघात उदयसिंग राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार मनोज पवार यांचे आव्हान आहे.