इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने आता नवी इनिंग सुरू केली आहे. महिला प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मार्गदर्शक म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याची माहिती दिली आहे. यासंर्भात सानिया म्हणाली की, तिला क्रिकेट संघाचा मार्गदर्शक बनण्याची ऑफर मिळाल्याचे मला स्वतःला आश्चर्य वाटले होते, पण नंतर मी ती ते स्वीकारली.
आरसीबीने सांगितले आहे की, “भारतीय महिलांसाठी खेळातील एक अग्रणी, एक युवा आयकॉन जी तिच्या संपूर्ण कारकिर्दीत निर्भयपणे खेळली आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिले, मैदानावर आणि मैदानाबाहेर ती चॅम्पियन आहे. आरसीबी महिला क्रिकेट संघाची मार्गदर्शक म्हणून सानिया मिर्झाचे स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मार्गदर्शक बनल्यानंतर सानियाने एका सांघिक मुलाखतीत सांगितले की, “मला थोडे आश्चर्य वाटले, पण मी उत्साहित होते. सुदैवाने किंवा दुर्दैवाने, मी २० वर्षांपासून एक व्यावसायिक खेळाडू आहे. माझे पुढील काम मदत करणे हे आहे. तरुण स्त्रिया आणि युवक. मुलींना असा विश्वास देण्याचा प्रयत्न करणे की खेळ त्यांच्यासाठी करिअरचा पहिला पर्याय असू शकतो.”
रॉयल चॅलेंजर्समध्ये ती काय आणेल असे विचारले असता, मिर्झा म्हणाली की, कोणत्याही खेळातील दबाव हाताळणे ही सर्वात महत्वाची बाब आहे आणि ती खेळाडूंसोबत त्यांच्या मानसिक पैलूवर काम करेल. क्रिकेट आणि टेनिसमध्ये खूप समानता आहेत. प्रत्येक खेळाडू सारखाच विचार करतो, त्याच दबावातून ते जातात. फक्त दबाव परिस्थिती हाताळणे, ते स्वीकारणे खूप महत्वाचे आहे. दबाव ही एक खास गोष्ट आहे, जर तुम्ही ती स्वीकारू शकत नाही, तर तुम्ही दबावाखाली चांगले होऊ शकत नाही. सर्वात मोठे चॅम्पियन ते आहेत जे दबाव हाताळू शकतात. सानिया पुढे म्हणाली की, “मानसिक पैलूच्या बाबतीत मी टीममधील महिला खेळाडूंसोबत काम करण्यास उत्सुक आहे. आयपीएलने पुरुष क्रिकेटसाठी जे काही केले ते महिला क्रिकेटसाठी करता आले, तर तरुण मुलींसाठी हा खेळ खेळणे स्वाभाविक ठरू शकते.
१३ फेब्रुवारी रोजी झालेल्या महिला प्रीमियर लीग लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मंधानाला ३.४ कोटींमध्ये विकत घेतले आणि या लीगच्या इतिहासात विकली जाणारी ती पहिली खेळाडू ठरली. यासोबतच मंधाना ही लीगमधील सर्वात महागडी खेळाडू आहे. मंधना व्यतिरिक्त, टीममध्ये सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, रेणुका सिंग आणि रिचा घोष आहेत.
दरम्यान, क्रिकेट संघाची मार्गदर्शक म्हणून सानियाला जबाबदारी मिळाल्यानंतर पाकिस्तानचे नागरिक हैराण झाले आहे. खरे तर ते बुचकळ्यात पडले आहेत.
https://twitter.com/RCBTweets/status/1625698680161402881?s=20&t=BeusOFXfB6gVEOtVu1p9Ww
Sania Mirza is now Mentor of Team RCB WPL
Tennis Cricket