सांगली/जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतात काम करताना रात्री – अपरात्री मोटर विद्युत मोटर सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना जावे लागते, तेव्हा अनेकदा दुर्घटना घडतात, काही वेळा विंचू साप चावतो, तर काही वेळा शॉर्टसर्कीट किंवा ओल्या पायाने विद्युत मोटर सुरू केल्यास विजेचा धक्का लागून जीवही गमावा लागतो. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये एका मायलेकीचा तसेच एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे पहिली घटना ही सांगली जिल्ह्यातील एका खेडेगावात घडली असून त्यामध्ये एका मायलेकींच्या शेतात विजेच्या धक्क्याने मंजूर झाला तर दुसऱ्या घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नजिक गावात घडली. विजेच्या दक्षाने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ जखमी झाला.
सांगलीत मायलेकीचा मृत्यू…
शेतात काम करण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा विद्युत तारेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील कुरळप या गावात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. वंदना माळी (वय ४५) आणि माधुरी माळी (वय २०) असे मयत माय लेकीचे नाव आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वंदना माळी या मुलीसोबत दरम्यान कुरळप वशी हद्दीवरील शेतात लागवड करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी ६ वाजता ऊसाच्या शेताच्या बांधावरून घरी परतत असताना विद्युत पुरवठा करणारी तार तुटून पडलेली होती. या तारेला माधुरी हिचा चूकून स्पर्श झाला. त्यामुळे तिला जबर शॉक लागला. मुलीला शॉक लागल्याचे कळताच आईने तिच्याकडे धाव घेतली. मात्र, तिला वाचवण्याच्या नादात आईचाही मृत्यू झाला. आणखी वाईट गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत एक पाळीव कुत्रा सुद्धा या घटनेत मृत्युमुखी पडला. वंदना यांचा मुलगा संजीव माळी हा त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेला. त्यांना उठवण्याच्या नादात त्याच्याही हाताला जोरदार शॉक लागला. मात्र, सुदैवाने तो घटनेतून बचावला. विद्युत पुरवठा अधिकाऱ्यांच्या हालगर्जी व निष्काळजी कामामुळे आज त्यांना नाहक जीव गमवावा लागला. ही दुर्देवी घटना घडून ही रात्री उशिरा पर्यंत विद्युत पुरवठा अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला होता.
युवकाचा मृत्यू; वाचवायला गेलेला भाऊ जखमी
दुसऱ्या एका घटनेत शेतात काम करीत असताना विजेचा शॉक लागून १७ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पारंबी (ता. मुक्ताईनगर) गावात घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत शॉक लागलेल्या विद्यार्थ्याला वाचवताना त्याचा मोठा भाऊ जखमी झाला आहे. शेतकरी संतोष झांबरे यांना दोन मुले असून मोठा चेतन हा जळगाव येथे शिकतो. तर लहान गौरव हा नुकताच दहावीची परीक्षा ८३ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊन त्याने अकरावीत प्रवेश घेतलेला होता. गौरव हा शाळेत जाण्यापूर्वी शेतातून येतो असे सांगून आपल्या मोठ्या भावासोबत शनिवारी सकाळी शेतात गेला. त्या ठिकाणी गौरवला विजेच्या वायरचा जबर शॉक लागल्याने तो वायरला चिटकला. त्याला वाचविण्यासाठी त्याचा मोठा भाऊ चेतन पुढे गेला असता, तो जोराने फेकला जाऊन गंभीररित्या जखमी झाला. घटना घडताच आजूबाजूचे शेतकरी धावून आले. दोन्ही भावडांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, पुढील उपचारार्थ मलकापूरला पाठवण्यात आले. तेथे गौरवला डॉक्टरांनी मृत घोषित केले.