सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पारंपारिक पिकांना फाटा देत सध्या अनेक शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच काहीसा प्रयोग करत सांगली जिल्ह्यातील कुंडलच्या येथील एका तरुण शेतकर्याने अवघ्या सव्वा एकर पपई लागवडीतून लाखोंचे उत्पन्न घेण्याची किमया केली आहे. प्रतिक पुजारी असे या युवा शेतकर्याचे नाव आहे
यावर्षी राज्यात अनेक झालेल्या अतिवृष्टीमध्ये कापूस, सोयाबीन, मकासह सर्वच पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अशात आता शेतकरी हतबल झाले आहे. मात्र अशा संकटकाळातही काही शेतकरी नवनवीन प्रयोग करुन मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेवून दाखवित आहेत. गतवर्षी मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पपईची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. परंतू पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. यामुळे यंदा फारशी कुणी लागवड केली नाही.
सततच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हातबल झाला असून त्यातच उत्पन्न आले तर बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुण शेती ऐवजी उद्योग व्यवसाय किंवा शहरात जाऊन नोकरी करतात. परंतु योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले, तर शेती देखील फायदेशीर ठरू शकते असे महाराष्ट्रातील अनेक तरुण शेतकऱ्यांनी आपल्या यश कथेतून दाखवून दिले आहे.
परंतु नैसर्गिक संकटावर मात करुनही काही
सांगली, सातारा, कोल्हापूर भागात काही शेतकरी उत्तम प्रकारची शेती करत आहेत. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चांगले उत्पादन घेतात. प्रतिक पुजारी ( वय २५ ) या युवा शेतकर्याने सव्वा एकर पपईच्या शेतीतून आत्तापर्यंत सुमारे २३ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे आपल्या सव्वा एकरमध्ये प्रतिकने १,१०० पपईची झाडे लावली असूनही बाग लावून आता २ वर्ष झाली आहेत. या पपईचे गेल्या दिड वर्षात उत्पादन सुरुच आहे. आत्तापर्यंत सुमारे २०० टन पपईचे उत्पादन निघाल्याची माहिती प्रतिक पुजारी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. या उत्पादनातून २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे प्रतिक यांनी सांगितले. .
या संदर्भात माहिती देताना प्रतिक पुजारी यांनी सांगितले की, मी पपईच्या ‘ १५ नंबर’ या वाणाची लागवड केली होती. त्यामधून भरघोस उत्पादन निघाले. तसेच या शेतीसाठी रासायनिक तसेच सेंद्रीय खतांचा वापर केला. त्यामुळे जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढवला, तसेच पिकांची फेरपालट केली असून पपईच्या लागवड करण्यापूर्वी मातीचं परिक्षण केले आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे योग्य नियोजन केले असून ठिबक पद्धतीने बागेला पाणीपुरवठा केला. त्याशिवाय शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.
दरम्यान, यापुर्वी सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील दोघा शेतकर्यांनी पावने दोन एकरामध्ये लाखोंचे उत्पन्न घेण्याची किमया करुन दाखविली होती. कन्हेर गावातील बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूनी केवळ पावने दोन एकरामध्ये पपईच्या २१०० रोपांची लागवड केली होती. त्यांच्या पपई बागेतील एका झाडाला अंदाजे ८० ते ९० फळ लागले त्यातून सरगर बंधू यांना तब्बल २२ लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षी असाच काहीसा प्रयोग करत औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील थेरगाव येथील एका तरुण शेतकर्याने अवघ्या दोन एकर पपई लागवडीतून लाखोंचे उत्पन्न घेण्याची किमया केली आहे. २५ लाखाचे उत्पन्न घेणाऱ्या या युवा शेतकर्याचे नाव अमोल ताकपीर असे आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रातील हे युवा शेतकरी सर्वांचे आदर्श ठरत आहेत.
Sangli Farmer 23 Lakh Production Papaya Success Story