गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सफाई कामगार मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन

by Gautam Sancheti
जुलै 14, 2025 | 7:14 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200514 WA0092


संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– संगमनेर शहरात सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटार सफाई करताना गुदमरून एक कर्मचारी व त्याला वाचवायला गेलेल्या स्थानिक तरुण अशा दोघांना आपला जीव गमावा लागला. या प्रकरणी ठेकेदार मे.आर.एम.कातोरे अँड कंपनी आणि बी.आर.क्लिनिंगचे ठेकेदार अशा तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे वृत्त अनेक वृतपत्रांनी दिले आहे.पण एक ही कामगार संघटनेचा नेता या घटनेचा निषेध करण्यासाठी पुढे आला नाही.ही खंत रविंद्र सूर्यवंशी अध्यक्ष स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन यांनी व्यक्त केली.

कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती.या घटनेनंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी शहर पोलिसात धाव घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.पोलिसानी नेहमी सारखी उदासीनता दाखवली.संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी कोल्हेवाडी रोडवरील गटार साफसफाईचे काम सुरू असताना अतुल रतन पवार या कर्मचार्‍याचा गुदमरून मृत्यू झाला.त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज जावेद पिंजारी (वय 21,रा.मदिनानगर) हा तरुणही गटारात गुदमरला आणि त्याचाही उपचारा दरम्यान गुरुवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी संगमनेर नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अमजद पठाण यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मध्यरात्री एक वाजता फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार,एसटीपी प्लांटचे मुख्य ठेकेदार मे.आर.एम.कातोरे अँड कंपनीचे रामहरी मोहन कातोरे आणि निखिल रामहरी कातोरे तसेच बी.आर. क्लिनिंगचे ठेकेदार मुश्ताक बशीर शेख या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संबंधित ठेकेदारांनी नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे.एसटीपी प्लांटच्या भूमिगत गटारींच्या साफसफाईचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही योग्य ती काळजी घेतली नाही.तसेच,आरोग्य विभागाची पूर्वपरवानगी न घेता आणि आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय मजुरांना गटारात उतरवले.यामुळे कर्मचार्‍याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही निष्काळजीपणाचे कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महानगरपालिका,नगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत मध्ये कंत्राटी कामगारांनी जीव धोक्यात घालून कोणत्याही अधिकाऱ्याच्या दडपणा खाली काम करू नये.राज्यातील सर्व महानगरपालिका,नगरपालिका, नगरपरिषद,नगरपंचायत मधील कंत्राटी कामगारांनी संघटित झाले पाहिजे अन्यता असे बळी जातील.असे असंघटित कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्का लढणारे कामगार नेते सरदार गुलाबसब शेख यांनी आवाहन केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी विरोधकांचे डावपेच ओळखावे, जाणून घ्या, सोमवार, १४ जुलैचे राशिभविष्य

Next Post

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला…या नेत्यांनी केला तीव्र शब्दात निषेध

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Gvvki3JXYAAKtpa

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला…या नेत्यांनी केला तीव्र शब्दात निषेध

ताज्या बातम्या

Gyy4 pSWYAAjtUr e1755777906342

खासदार सुनेत्रा अजित पवार संघाच्या कार्यक्रमात…वेगवेगळ्या प्रतिक्रियेनंतर दिले स्पष्टीकरण

ऑगस्ट 21, 2025
rohit pawar

शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांना न्यायालयाकडून दिलासा

ऑगस्ट 21, 2025
kapus

कापूस आयात शुल्क माफीचा निर्णय: शेतकरी नाराज

ऑगस्ट 21, 2025
Screenshot 20250821 161509 Facebook 1

नाशिक महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई….या भागात रस्त्यालगत उभारलेली ३० अनधिकृत गाळे व पत्राशेड हटवले

ऑगस्ट 21, 2025
प्रातिनिधिक फोटो

दिवाळी आणि छठ पूजेसाठी १२ हजाराहून अधिक विशेष रेल्वे गाड्या…परतीच्या तिकिटांवर इतके टक्के सूट

ऑगस्ट 21, 2025
Untitled 26

सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित….राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011