संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जय़श्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्यामुळे गाड्यांची तोडफोड कऱण्यात आली. माजी खासदार सुजय विखे यांच्या धांदरफळ येथील सभेत या गावातील वसंतराव देशमुख यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटाकडून आरोप – प्रत्यारोप होत असतांना आज मात्र एका विधानाने त्याला हिंसक गालबोट लागले. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा करुन प्रचाराला सुरुवात केल्यानंतर संमगनेरचा राजकीय वातावरण तापले आहे.