संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरण, पुण्यात सहा वर्षाच्या शाळकरी मुलींच्या घटनेनंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खराडी जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणा-या मुलींशी बाळशीराम यशवंतराव बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले. दुपारी सुट्टीत एक मुलगी रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानतंर हा प्रकार समोर आला.
दरम्यान या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी शाळेतील शिक्षकाविरुध्द बालकांचे लैगिंक अत्याचार कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत.
चार ते पाच मुलीबरोबरही असभ्य वर्तन
या प्रकरणात इतर चार ते पाच मुलीबरोबरही बाळशीराम बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले होते. मुख्याध्यापकांनी त्या सर्व मुलींना बोलावून चौकशी केली. त्यांनी त्या शिक्षकाच्या कारनाम्याचा पाढा वाचला. त्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वर्गशिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे हे शाळेत नव्याने रुजू झाले. ते शाळेत आल्यापासून असे प्रकार करत आहेत. याबाबत मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी उल्लेख करण्यात आला आहे.