संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संगमनेर नगर परिषदेचा सिटी लेवल टेक्निकल सेल अभियंता विकास सुरेश जोंधळे (वय २८ वर्ष) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर एसीबीने सापळा रचला होता. १७ हजार रुपयांची लाच घेताना लाचखोर जोंधळे रंगेहाथ सापडला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री शहरी आवास योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी एका व्यक्तीने संगमनेर नगरपरिषद येथे अर्ज दाखल केला होता. मंजूर झालेल्या अनुदानाची शिफारस करून अनुदान मिळवून देण्यासाठी लाचखोर जोंधळेने तब्बल ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी दुसऱ्या हप्त्याच्या २० हजार रुपये लाचेची रक्कम तडजोडी अंती १७ हजार रुपये निश्चित करण्यात आली. ही लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून नमूद लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष लाचखोर जोंधळेने स्वीकारली. आणि त्याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी जोंधळे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी
संदीप साळुंखे, (पोलीस निरीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, मो. 8605017710
सापळा पथक
– पो. ह. पंकज पळशीकर , पो.ना. नितीन कराड, पो.ना.प्रकाश महाजन चापोना/परशुराम जाधव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४
Sangamner ACB Trap Bribe Engineer Corruption