मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री व भाजपचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यांना बेलापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण, भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा संधी दिल्यामुळे ते नाराज आहे.
रविवारी भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात गणेश नाईक यांना एेरोली मतदार संघातून उमेदवारी दिली. पण, बेलापूरची जागा दिली नाही. त्यामुळे संदीप नाईक नाराज असून त्यांनी वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१४ मध्ये मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला होता. वडीलांचा हा बदला घेण्यासाठी संदीप नाईक हे मैदानात उतरणार आहे. वाशी येथे मोठा मेळावा घेऊन ते हा पक्षप्रवेश करणार असल्याचेही बोलले जात आहे. आता गणेश नाईक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.