विशेष प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहरासह जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननाबाबत असंख्य तक्रारी येत असल्याने त्याची दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.
मा. उच्च न्यायालयाने गोदावरी प्रदूषण संदर्भात गठित केलेल्या टास्क फोर्स मध्ये केवळ दोन अशासकीय सदस्य आहेत. आत्महत्या विषयक समितीमध्ये सुद्धा केवळ दोन अशासकीय सदस्य आहेत. परंतु पर्यावरण हा अत्यंत व्यापक विषय असल्याने शाश्वत विकास व पर्यावरण संरक्षण हे उद्दिष्ट परस्पर समन्वयाने गाठण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित घटकांना या पर्यावरण टास्क फोर्स मध्ये स्थान देण्यात आलेले आहे. कार्यकक्षेप्रमाणे प्रभावी काम करून हा टास्क फोर्स आपले ध्येय गाठेल याचा मला विश्वास आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक
—
आदेश असे