मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सॅमसंग गॅलेक्सी S20+ स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर गुलाबी किंवा हिरव्या उभ्या रेषा दर्शविणे सुरू केले आहे. ग्राहकांनी ही समस्या सोशल मीडियावर आणली आहे. त्यांच्यापैकी काहींनी सॅमसंग कम्युनिटी फोरमवर तक्रारी देखील पोस्ट केल्या आहेत. ही समस्या Samsung Galaxy S20+ वापरणाऱ्या ठराविक लोकांना येत आहे. काही युझर्सच्या म्हणण्यानुसार अलीकडेच त्यांनी One UI अपडेट केले असून त्यानंतरच ही समस्या निर्माण झाली आहे.
ट्विटरवर युझर्सच्या ट्विट्सनुसार, सॅमसंग गॅलेक्सी S20+ डिस्प्ले अचानक गुलाबी किंवा हिरव्या उभ्या रेषा दर्शवू लागला आहे. मोबाईलला कोणताही अपघात झाला नसतानाही ही समस्या येत आहे. काही प्रकरणांमध्ये, या समस्येचा सामना करत असलेले युझर्स त्यांचे Galaxy S20+ जवळच्या केअर सेंटरमध्ये घेऊन गेले, जिथे त्यांना त्यांची स्क्रीन बदलण्याचा सल्ला देण्यात आला. पण, त्यासाठी १५ हजार ५०० रुपयांचा खर्च मागण्यात येत आहे. जी २०२०मध्ये लॉन्च झालेल्या या फोनच्या अधिकृत किंमतीच्या २० टक्क्यांहून अधिक आहे.
उभ्या रेषा अचानक दिसण्याचे नेमके अजून अस्पष्ट असले तरी बहुतेक लोकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्यांनी फोन One UI 4.01 वर अपडेट केला तेव्हा ही समस्या समोर आली.
सॅमसंग कम्युनिटी फोरमवरील एकाने सांगितले की, सॅमसंग सपोर्ट टीमने ही समस्या येत असल्याचे कबूल केले आहे. एका युझरने शेअर केलेल्या सपोर्ट टीमच्या ईमेल स्क्रीनशॉटनुसार, कंपनीने १५ हजार ५१५ रुपयांच्या एकूण दुरुस्ती शुल्कावर २५ टक्के सूट देऊ केली आहे.
ही समस्या Samsung Galaxy S20+ पुरती मर्यादित असल्याचे दिसते. कारण नियमित Galaxy S20 किंवा Galaxy S20 Ultra वर समान समस्येबद्दल अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही. पण ही समस्या S20 Ultra मध्ये देखील आली आहे. Samsung Galaxy S20+ वापरकर्ते डिस्प्लेच्या समस्यांबद्दल तक्रार करताना पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही फोनच्या डिस्प्लेवर पांढरे किंवा हिरवे पॅच दिसून आले आहेत.