इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगने आज १ टीबी मेमरी स्टोरेजचा Galaxy S22 Ultra हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनच्या विक्रीसाठी सॅमसंगच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सॅमसंग लाईव्हवर एक विशेष सेल इव्हेंट आयोजित केला जाणार आहे. २८ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता हा लाइव्ह इव्हेंट होणार असून, त्यादरम्यान सॅमसंग फोनचे हे नवीन मॉडेल ग्राहक खरेदी करू शकतात.
सॅमसंगने गेल्या काही महिन्यात अनेक नवनवीन स्मार्टफोन बाजारात उपलब्ध करुन दिले आहे. प्रत्येक स्मार्टफोनची वैशिष्ट्य ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. आता ग्राहकांमध्ये Galaxy S22 Ultra १ टीबी स्टोरेज या स्मार्टफोनचे कुतूहल निर्माण झाले आहे. हा फोन केवळ सॅमसंग ई-स्टोअरवर उपलब्ध असेल आणि त्याची किंमत १ लाख ३४ हजार ९९९ रुपये असणार आहे. विशेष म्हणजे हा Galaxy S22 Ultra खरेदी केल्यास २९ हजार रुपये किंमतीचे Galaxy Watch4 फक्त २ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळू शकणार आहे. जे ग्राहक लाइव्ह सेल इव्हेंट दरम्यान Galaxy S22 १ टीबी प्रकार खरेदी करतात त्यांनाच हे Galaxy Watch4 २ हजार ९९९मध्ये मिळणार आहे. याशिवाय, Galaxy S आणि Galaxy Note मालिकेतील ग्राहकांना ८००० रुपयांचा अपग्रेड बोनस देण्यात येणार आहे. पण हे सर्व Galaxy S22 Ultra १ टीबी हा स्मार्टफोन खरेदी केल्यावरच दिले जाणार आहे.
Samsung Galaxy S22 Ultra ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये १०८ MP क्वाड कॅमेरा आहे. दुसरी लेन्स १२ MP अल्ट्रा वाईड अँगलची आहे, तिसरी लेन्स ३ x ऑप्टिकल झूमसह १० MP टेलिफोटो आहे. चौथी लेन्स १० x ऑप्टिकल झूम सारख्या वैशिष्ट्यासह १० MP टेलिफोटो लेन्स आहे. यात ४० मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हा सर्वात महाग सॅमसंग फोनपैकी एक आहे आणि एस पेनसह येतो जो फोनच्या मुख्य भागामध्ये राहील. एस पेन लाइक ऍपल पेन्सिल, जे फोनच्या ड्राफ्टमध्ये पेन कॉपीप्रमाणे लिहिता येते.
फोनमध्ये ६.८ इंचाचा QHD + Dynamic AMOLED २ X डिस्प्ले आहे. गोरिला ग्लास व्हिक्टससाठी देखील या मोबाइलमध्ये सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॉडीवर आर्मर अॅल्युमिनियम लावण्यात आले आहे. सॅमसंगने फोनसोबत आय कम्फर्ट शील्डदेखील दिले आहे. त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होऊ शकते. शिवाय, Samsung Galaxy S22 Ultra मध्ये Snapdragon ८ Gen १ प्रोसेसर, १२ GB RAM आणि ५१२ GB स्टोरेजदेखील आहे. हा फोन फाय जी नेटवर्कला सपोर्ट करतो. एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर यामध्ये देण्यात आले असून, फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. त्यासाठी ४५ वॅटफास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.