इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात अनेक कंपनीचे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. सर्वोत्तम फीचर्ससह मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर Samsung Galaxy M53 5G (6GB+128GB) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा फोन Amazon India वर उत्तम ऑफर्ससह खरेदी करू शकता. या फोनवर कंपनी 2500 रुपयांची झटपट सूट देत आहे. या सवलतीसाठी, ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील.
एक्सचेंज ऑफर म्हणून फोन घेऊन अधिक पैसे वाचवू शकता. Amazon India वर एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन घेतल्यास ग्राहकाला 10,550 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. या ऑफरमध्ये ग्राहकाला किती एक्सचेंज बोनस मिळेल हे जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. हा फोन सध्या Amazon India वर 26,499 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. सदर कंपनी फोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर देत नाही. त्यामुळे वेगळा चार्जर खरेदी करावा लागेल.
या फोनमध्ये, कंपनी 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फुल एचडी + डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील देण्यात आला आहे. हा सॅमसंग फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे देत आहे.
यामध्ये 108-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर, 2-मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर हा Samsung फोन Android 12 वर आधारित नवीनतम OneUI वर काम करतो.