विशेष प्रतिनिधी, मुंबई
सॅमसंग कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एम 32 लॉन्च केला असून या फोनची प्रथम विक्री सुरू झाली आहे . सदर स्मार्टफोन हा ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन, सॅमसंग इंडिया ऑनलाइन स्टोअर व प्रमुख रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल.
सदर स्मार्टफोनमध्ये 6,000 एमएएच बॅटरी, 64-मेगापिक्सेल कॅमेरा आणि मीडियाटेक हेलियो जी 80 प्रोसेसर सारखे फीचर्स देण्यात आल्या आहेत. या फोनची थेट स्पर्धा रेडमी नोट 10 एस, पोको एम 3 प्रो, रियलमी 8, या 5 जी सारख्या फोनविरुद्ध आहे.
किंमत व ऑफर
सदर स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये आला आहे – 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज. फोनच्या 4 जीबी रॅम व्हेरिएंट फोनची किंमत 14,999 रुपये आहे आणि 6 जीबी रॅम व्हेरिएंट फोनची किंमत 16,999 रुपये आहे. विशेष म्हणजे ऑफरअंतर्गत आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना 1,250 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे. म्हणजेच 13,749 रुपयांच्या किंमतीला हा फोन घेण्यास ग्राहकांना संधी मिळेल.
ही आहेत वैशिष्ट्ये
सॅमसंग गॅलेक्सी एम 32 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुल-एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेजसह ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी 80 प्रोसेसर आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनची स्टोरेज वाढवता येऊ शकते. यात साइड-माऊंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
२० मेगापिक्सलचा कॅमेरा
फोटोग्राफीसाठी गैलेक्सी एम 32 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटर, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सलचा खोलीचा सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनच्या समोर 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 32 ला 6,000 एमएएच बॅटरीचा बॅकअप देण्यात आहे, तो 25 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या बॉक्समध्ये एक 15 डब्ल्यू चार्जर उपलब्ध आहे.